भारतात बाल सुरक्षेला चालना देण्यासाठी तीन स्वयंसेवी संस्थांना पाच लाख डॉलर्सचे अनुदान इंटरनेट क्षेत्रातील गुगल या कंपनीने जाहीर केले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट उपयोजने (अ‍ॅप्स) तयार करण्याचे तंत्रज्ञान तसेच कार्यक्रम व प्रचार मोहिमा यांना गती मिळण्याची शक्यता आहे.
गुगल ओआरजीच्या माध्यमातून चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशनला अनुदान दिले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून मुलांच्या संरक्षणासाठी १०९८ क्रमांकाची फोन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. बचपन बचाव आंदोलनासही अनुदान दिले जाणार असून ही संस्था मुलांना गुलामगिरी, तस्करी व बाल मजुरीतून मुक्त करते. तुलिर या तिसऱ्या संस्थेला अनुदान दिले जात असून मुलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी ही संस्था काम करते.
गुगल इंडिया व आग्नेय आशियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी म्हटले आहे की, तंत्रज्ञान हे लहान मुलांचे जीवनमान बदलण्यास उपयुक्त ठरते, त्यामुळे चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन, बचपन
बचाव आंदोलन व तुलिर या तीन संस्थांना अनुदान देण्यात येत आहे. २०१४ मध्ये गुगलने जगभरात १० कोटी डॉलर्सची अनुदाने दिली असून त्यात १ अब्ज तंत्रज्ञान साधनांसाठी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुदान जाहीर केलेल्या संस्था
* चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन
* बचपन बचाव आंदोलन
* तुलिर

अनुदान जाहीर केलेल्या संस्था
* चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन
* बचपन बचाव आंदोलन
* तुलिर