बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन महिलांसह पाच नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. इंद्रावती अभयारण्याच्या भागात रविवारी सकाळी सुरक्षा जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्षलविरोधी मोहीम राबवणाऱ्या संयुक्त पथकामध्ये राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव दल (डीआरजी), विशेष कृतीदल (एसटीएफ) आणि जिल्हा दल यांच्या जवानांचा सहभाग होता.

हेही वाचा >>> सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस

घटनास्थळी गणवेषातील तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्याशिवाय स्वयंचलित बंदुकांसह शस्त्रे आणि स्फोटकेही ताब्यात घेण्यात आली. चकमकीनंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

आयईडी स्फोटात दोन पोलीस जखमी

नक्षल्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना बीजापूरमध्ये जैनूर गावातील जंगलात घडली. दोन्ही पोलीसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five naxalites including two women killed in chhattisgarh zws