काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारोप समारंभात सहभागी होण्यासाठी देशभरातील २१ समविचारी पक्षांना काँग्रेसने निमंत्रण दिलं होतं. तर ५ पक्षांना काँग्रेसने निमंत्रण पाठवलं नाही. या २१ पैकी १२ पक्ष आजच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर उर्वरित ९ पक्षांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते पक्ष या कार्यक्रमात सहभागी होतील तर कोणते पक्ष या कार्यक्रमात दिसणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने निमंत्रण दिलेल्या २१ राजकीय पक्षांपैकी १२ पक्षांचे नेते कार्यकर्ते भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होतील. यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील.

या पक्षांना निमंत्रण नाही

एआयडीएमके, जगनमोहन रेड्डी यांची वायएसआरसीपी, नवीट पटनायक यांची बीजेडी, असदुद्दीन ओवैसी यांची एआयएमआयएम आणि एआययूडीएफ या पक्षांना काँग्रेसने आमंत्रित केलं नाही. म्हणजेच हे पक्ष भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात दिसणार नाहीत. अशी माहीती सूत्रांच्या हवाल्याने अमर उजालाने प्रसिद्ध केली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव तृणमूलसह काही पक्ष सहभागी होणार नाहीत

काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेत्या समारोप समारंभात सहभागी होणार नाहीत. यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> भारत जोडो यात्रा संपल्यानंतर लवकरच नवी यात्रा? राहुल गांधींचे सूचक विधान; म्हणाले “माझ्याकडे दोन ते…”

भारत जोडो यात्रेचा समारोप समारंभ

भारत जोडो यात्रेचा औपचारिक समारोप समारंभ सोमवारी श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात होईल. त्यानंतर शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात एक रॅली होईल. या रॅलीत काँग्रेससह एकसारखी विचारसरणी असलेले पक्ष सहभागी होतील.