गळ्यात स्पेशल कॅटेगिरीची पाटी अडकवून पाच वर्षांच्या एका मुलाने विमान प्रवास केला. आजपासून देशांतर्गत विमान प्रवासाला संमती देण्यात आली आहे. त्यामुळेच एका विवान नावाच्या एका मुलाने एकट्याने दिल्ली ते बंगळुरू विमान प्रवास केला. विवान शर्मा हा पाच वर्षांचा मुलगा तीन महिने त्याच्या आजी आजोबांकडे म्हणजेच दिल्लीत गेला होता. त्याला आज तीन महिन्यांनी जेव्हा विमान प्रवासाला संमती मिळाली तेव्हा आईजवळ परतता आलं. दिल्लीहून स्पेशल कॅटेगरीची पाटी गळ्यात घालून या मुलाने विमान प्रवास केला. बंगळुरु विमानतळावर त्याची आई त्याला घ्यायला आली होती. तीन महिन्यांनी भेटलेल्या पाच वर्षांच्या मुलाला मिठी मारावी असं या आईला वाटत होतं पण ती ते करु शकली नाही.सगळे नियम पाळून त्याला बंगळुरू विमानतळावरुन त्याच्या घरी नेण्यात आलं.

नेमकं काय घडलं?
विवान शर्मा तीन महिन्यांपूर्वी दिल्लीला गेला होता. तो त्याच्या आजी आजोबांकडे गेला होता. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाल्याने विमान प्रवासही बंद करण्यात आला. त्यामुळे विवान तीन महिने त्याच्या आजी आजोबांच्या घरीच होता. आजपासून आंतरदेशीय विमान प्रवासाला संमती देण्यात आली आहे त्यामुळे तो विमानाने एकटा प्रवास करुन घरी म्हणजेच बंगळुरुला परतला.

“प्रवासात त्याने मास्क, हँड ग्लोव्ह्ज अशी सगळी तयारी केली होती. तसेच स्पेशल कॅटेगरी अशीही पाटी त्याच्या गळ्यात होती” असं त्याच्या आईने सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

Story img Loader