बीबीसीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कपातीचा निषेध म्हणून पत्रकारांनी पुकारलेल्या बंदचा फटका वृत्त कार्यक्रम आणि रेडिओवरील कार्यक्रम खंडित होण्यात झाला. सकाळी दिल्या जाणाऱ्या बातम्या, रेडिओवरील अनेक कार्यक्रम आणि वृत्तकार्यक्रमांचे जगप्रसारण यामुळे झाले नाही. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संस्थेच्या सदस्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून चोवीस तासांचा बंद पुकारला. यामुळे बीबीसी स्कॉटलंड, रेडिओ ५ लाइव्ह, आशियामधील कार्यक्रम यांच्यासह जगभरात होणाऱ्या प्रसारणावर परिणाम झाला.
प्रकरण काय?
बीबीसीने काही दिवसांपूर्वी आपल्या ३० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. त्यांना कामावर पुन्हा घेण्यासाठी कामगार नेते आणि व्यवस्थापक यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्यामुळे बीबीसी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला.
बीबीसीच्या कार्यक्रमांना संपाचा फटका
बीबीसीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कपातीचा निषेध म्हणून पत्रकारांनी पुकारलेल्या बंदचा फटका वृत्त कार्यक्रम आणि रेडिओवरील कार्यक्रम खंडित होण्यात झाला. सकाळी दिल्या जाणाऱ्या बातम्या, रेडिओवरील अनेक कार्यक्रम आणि वृत्तकार्यक्रमांचे जगप्रसारण यामुळे झाले नाही. नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट या संस्थेच्या सदस्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून चोवीस तासांचा बंद पुकारला.
First published on: 20-02-2013 at 02:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flagship shows cancelled as bbc journalists strike