मागील तीन वर्षांत आरोग्य क्षेत्रात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. २०१९ च्या सुरूवातीला झालेला करोनाचा उद्रेक ते या वर्षातला मंकीपॉक्स, अशा अनेक गंभीर परिस्थितीतून जगाला जावं लागलं. तसेच या वर्षातदेखील जगाला १० मोठ्या विषाणूंचा सामना करावा लागला. २०२२ मध्ये जगाला वेठीस धरणारे नऊ विषाणू नेमके कोणते होते, जाणून घेऊया.
हेही वाचा – Flashback 2022: ग्राहकांना वेड लावणाऱ्या ‘या’ आहेत देशातील परवडणाऱ्या बाईक्स; मायलेजही दमदार
इबोला विषाणू
२०२२ या वर्षाच्या सुरूवातीला इबोला विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात गिनीच्या आरोग्य मंत्रालयाने पहिल्यांदा इबोलाची संशयित प्रकरणे नोंदवली होती. मात्र, या वर्षीच्या सुरुवातीला जगभरात हा विषाणू पसरला. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना रक्तस्त्राव आणि उलट्या अशी लक्षणं आढळून आली. १९ जून २०२२ रोजी गिनीच्या आरोग्य मंत्रालयाने (MoH) इबोलाचा विषाणू संपल्याची घोषणा केली.
एव्हीयन इन्फ्लूएंझा ए (एच १० एन ३ )
३१ मे २०२१ रोजी चीनच्या आरोग्य मंत्रालयाने चीनमध्ये एव्हीयन इन्फ्लूएंझा या विषाणूची पुष्टी केली होती. करोनानंतर चीनमधून निघालेला हा दुसरा विषाणू होता. मात्र, २०२२ मध्येही हा विषाणू झपाटाने पसरला. त्यामुळे जगभरातील अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला होता.
झिका विषाणू
झिका विषाणूचा प्रादुर्भाव भारतासह जगभरात दिसून आला. हा विषाणू एडिस (Aedes ) या डासाद्वारे पसरतो. या विषाणूमुळे शरीरावर पुरळ येणे, स्नायू दुखणे, ताप लक्षणे आढळून येतात. या विषाणूची लक्षणं सौम्य असली तरी गर्भवती महिलेला या विषाणूचा मोठा धोका आहे. यामुळे तिच्या बाळावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निपाह विषाणू
निपाह विषाणू हा एक झुनोटिक आजार आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. वटवाघळांच्या संपर्कात आल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे. ताप येणे, श्वास लागणे, मेंदुज्वर, स्नायू दुखणे, उलट्या आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या वर्षाच्या मध्यात या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला.
मंकीपॉक्स
२०२२ या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषाणू म्हणजे मंकीपॉक्स. या विषाणूने करोनानंतर सर्वाधित थैमान माजवले होते. मंकीपॉक्सचा संसर्ग हा एखाद्या व्यक्तीचं चुंबन घेणे, त्याला स्पर्श करणे, तोंडावाटे पसरु शकतो. शरीरसंबंधांबद्दल सांगायचे झाल्यास योनीतून किंवा गुदद्वारासंबंधीच्या संभोगासह संसर्ग झालेल्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क झाल्यास हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो. भारतात मंकीपॉक्सची पहिली केस मे महिन्यात आढळली होती. या वर्षात जगभरात मंकीपॉक्सची ८० हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि तर ५५ मृत्यूची नोंद झाली आहे.
लम्पी विषाणू
लम्पी हा त्वचेचा आजार आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांमध्ये दिसून येतो. २०२२ या वर्षात या आजारामुळे भारतात लाखो प्राण्याचा मृत्यू झाला. याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात बघायला मिळाला. एलएसडी (LSD) डासाद्वारे हा विषाणू प्राण्यांमध्ये पसरला होता.
टोमॅटो फ्ल्यू
टोमॅटो फ्लू हा आजार Coxsackievirus A16 या विषाणूमुळे होतो. हात, पाय दुखणे, शरीरावर पुरळ येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराची सुरुवातीची लक्षणे करोनासारखीच असली, तरी करोनाचा या आजाराशी काहीही संबंध नाही. दरम्यान, २०२२ या वर्षात या आजारामुळे मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा मृत्यू झाला.
स्वाईन फ्ल्यू
२०२२ या वर्षात मोठ्या प्रमाणात प्राण्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे आढळून आले. टाईप ए इन्फ्लूएंझा ( type A influenza ) या विषाणूपासून हा आजार होतो. हा आजार साधारणत: डूकरांमध्ये आढळून येतो. महत्त्वाचे म्हणजे स्वाइन फ्लूचा मानवाला संसर्ग होत नाही.
हेमोरेजिक आजार (Hemorrhagic fever )
या वर्षात हेमोरेजिक हा नवा आजार आढळून आला. या आजाराच्या विषाणूमुळे रक्त पातळ होते. तसेच नाकातून रक्तस्त्राव होतो. २०२२ मध्ये या आजारामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.