कंडोमचा वापर गर्भनिरोधक तसेच लैंगिक आजारापासून बचाव व्हावा म्हणून केला जातो. मात्र पश्चिम बंगालमधील दुर्गापूर या भागातील काही विद्यार्थी कंडोमचा वापर नशा करण्यासाठी करत असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे दुर्गापूरमधील शहरातील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, मुचीपारा आणि बेनाचिती, सी झोन, ए झोनसह शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री आश्चर्यकारकपणे वाढली आहे.
हेही वाचा >>> Lulu Namaz Row: व्हिडीओत दिसणाऱ्या सातही जणांना अटक; पोलिसांनी दिली माहिती
न्यूज १८ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार दुर्गापूर शहरामध्ये फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीमध्ये आश्चर्यकारकपणे वाढ झाली आहे. या कंडोमचा वापर तरुण नशेसाठी करत आहेत. कंडोम खरेदी करुन ते गरम पाण्यात भिजायला टाकले जात आहेत. त्यानंतर हे पाणी पिऊन तरुणांकडून नशा केली जात आहे. यामुळे तरुण जवळपास दहा ते १२ तास नशेत राहतात असे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे या भागात सध्या कंडोमची विक्री वाढलेली आहे. कंडोमच्या वाढत्या विक्रीबाबत दुर्गापूरमधील एका औषध विक्रेत्याने प्रतिक्रिया दिलेली आहे. “पूर्वी दिवसभरात एका औषध विक्रेत्याचे तीन ते चार कंडोमचे पॉकेट विकले जायचे. मात्र आता ही विक्री वाढली आहे,” असे औषध विक्रेत्याने सांगितले आहे.
हेही वाचा >>> पाकव्याप्त काश्मिरींना स्वातंत्र्य कधी मिळणार? RSS चा प्रश्न
दुर्गापूर आरई कॉलेज मॉडेल स्कूलचे रसायनशास्त्राचे शिक्षक नुरुल हक यांनी कंडोमच्या मदतीने केल्या जाणाऱ्या नशेबाबत सविस्तर सांगितले आहे. ” गरम पाण्यात भिजवत ठेवल्यामुळे कंडोमधील ऑरगॅनिक मॉल्यूक्यूल्स तुटतात. त्यातून अल्कोहोल तयार होते. याच रसायनाचा तरुण नशा म्हणून वापर करतात,” असे नुरुल हक यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>> “पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल”; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला दम
दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनुसार अशा प्रकारच्या वस्तुंचा नशेसाठी उपयोग केला जात असेल तर कारवाई करण्यासाठी भारतीय दंड संहितेत निश्चित असे कलम नाही. कफ सिरप, व्हाईटनर यासारख्या गोष्टींचे सेवन केल्यानंतर Narcotic Drugs and Psychotropic Act (NDPS) कायद्यानुसार कारवाई करता येत नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे कंडोमचा नशेसाठी उपयोग होत असेल तर काय कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.