Flies Helped Police : हत्या झाल्यानंतर ती हत्या कशी झाली? कुणी केली? का केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधतात. अनेकदा त्यात त्यांना यश येतं. अनेकदा फाईल बंद होतात. पण उडणाऱ्या माश्यांच्या मदतीने पोलिसांनी एका हत्येचा छडा लावला आहे. १९ वर्षीय तरुणाला त्याच्या २६ वर्षीय काकांची हत्या ( Flies Helped Police ) केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकी घटना का घडली?

३० ऑक्टोबरच्या संध्याकाळी मनोज ठाकूर हा त्याच्या पुतण्यासह म्हणजेच धरम सिंगसह मद्यपान करायला गेला. दिवाळीच्या आदला दिवस होता म्हणून त्यांनी मद्य विकत घेतलं. तसंच जेवणही पार्सल घेतलं. त्यानंतर मनोज ठाकूर घरी परतला नाही, पण त्याचा पुतण्या धरम सिंग एकटाच घरी आला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने मनोज ठाकूर हरवल्याची तक्रार जबलपूर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलीस बेपत्ता मनोज ठाकूरचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबरला पोलिसांना मनोजचा मृतदेह शहराबाहेरच्या एका शेतात सापडला. हा मृतदेह मनोज ठाकूरचाच आहे हे समजल्यावर पोलिसांनी त्या अनुषंगाने सोध सुरु केला. मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये ही घटना घडली आहे.

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mercedes Benz Accident
Mercedes Benz Accident : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवत तरुणाने एका महिलेला चिरडले, आरोपी अटकेत
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
मुंबईतील १६ वर्षीय मुलीवर रिक्षाचालक आणि सहा मुलांचा सामूहिक बलात्कार; कुठे घडली ‘ही’ संतापजनक घटना?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पोलिसांनी यानंतर धरमसिंगची केली चौकशी

पोलिसांनी मनोज ठाकूरचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याचा पुतण्या धरम सिंगची चौकशी सुरु केली. मनोज ठाकूरच्या मृत्यूनंतर ( Flies Helped Police ) अनेक कारणं होती ज्यामुळे धरम सिंगची चौकशी करण्याचं ठरवलं गेलं. कारण मृतदेहावर ओरबाडल्याच्या किंवा त्याला लुटल्याच्या खुणा नव्हत्या. या प्रकरणात मनोज ठाकूरचा पुतण्या धरम सिंग हा प्रमुख संशयित होता. सुरुवातीला धरम सिंगने निष्पाप असल्याचा आव आणला. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोनाली दुबे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात चौकशी करायचं पोलिसांनी ठरवलं. मात्र पोलिसांना या प्रकरणाचे काहीही धागेदोरे सापडत नव्हते. मनोज ठाकूरचा मृत्यू ही हत्या आहे हे पोलिसांना कळत होतं मात्र थेट कुठलाही पुरावा हा धरम सिंगच्या विरोधात जात नव्हता. मनोज ठाकूर आणि धरम सिंग हे दोघं एकत्र बाहेर गेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी आणखी एकदा तपास करायचं ठरवलं. यावेळी एक विचित्र घटना पोलिसांच्या लक्षात आली ती घटना होती. पोलिसांनी धरम सिंगला दुसऱ्यांदा चौकशीला येण्यासाठी समन्स बजावलं. त्यात एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. ती म्हणजे धरमसिंगच्या डोक्याभोवती माश्या घोंघावत ( Flies Helped Police ) होत्या. त्याने अनेकदा त्या माश्यांना ( Flies Helped Police ) हाकललं. पण त्या सारख्या त्याच्या मागे पुढे येत होत्या.

माश्यांच्या मदतीने पोलिसांनी हत्येचा छडा कसा लावला?

पोलिसांना निरीक्षणातून हे लक्षात आलं की धरम सिंगशिवाय त्या माश्या ( Flies Helped Police ) कुणाच्याही मागे लागत नाहीत. त्यानंतर जबलपूरचे पोलीस अधिकारी अभिषेक पायासी यांना ही बाब खटकली त्यांनी धरम सिंगला तुझा शर्ट काढून तपासासाठी दे असं सांगितलं. त्यानंतर तो शर्ट फॉरेन्सिकला पाठवण्यात आला. त्यावर रक्ताचे डाग असल्याचं लक्षात आलं. हे डाग डोळ्यांना दिसत नव्हते. मात्र फॉरेन्सिकला हे डाग असल्याचं कळलं त्यामुळेच माश्या धरम सिंग भोवती घोंगावत होत्या. त्यानंतर अखेर पुन्हा एकदा चौकशी करताना धरम सिंगने काका मनोज ठाकूर यांची हत्या केल्याचं कबूल केलं. तो म्हणाला की मद्यपान केल्यानंतर आमच्यात वाद झाला. त्यानंतर तो वाद विकोपाला पोहचला. धरम सिंगच्या म्हणण्यानुसार काका मनोज ठाकूर यांनी आधी मारलं. त्यानंतर लाकडाने मी त्याला मारलं ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हा कबुली जबाब दिल्यानंतर पोलिसांनी काका मनोज ठाकूर यांच्या हत्या प्रकरणात धरम सिंगला अटक केली.

Story img Loader