अमेरिकन एअरलाइन्सच्या एका फ्लाईटमध्ये प्रवाशाने ‘पुल अप’ काढल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. फोनिक्सवरून बॉस्टनला जाणाऱ्या प्लाइट क्रमांक २७६३मध्ये हा प्रकार घडला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दारूच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने आपल्या सीटवर अचानक व्यायाम सुरू केला. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यक्ती पुल अप काढतच राहिला. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले, आणि दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फोनिक्सवरून सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी निघणाऱ्या फ्लाइटमध्ये त्याने विमानामध्ये प्रवेश केला होता. विमानात प्रवेश करताना तो आधीच दारूच्या नशेत होता. विमानाने उड्डान केल्यानंतर त्या व्यक्तीने कर्मचाऱ्याकडे दारू मागवली. काहीवेळानंतर आपल्या सीटवर उभा राहिला, आणि ‘तुम्ही पण व्यायाम करण्याचा विचार करत आहात का?’ असे त्याने इतर प्रवाशांना मस्करीत विचारले.

मद्यधुंद असलेल्या व्यक्तीने काही वेळातच सीटवर पुल अप्स काढायला सुरूवात केली. पुल अप्स करत असेलेल्या व्यक्तीला पाहून इतर प्रवाशी आश्चर्यचकित झाले. तो व्यक्ति मद्यधुंत अवस्थेत बिनदास्तपणे पुल अप्स काढत होता. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद असलेला तो व्यक्ती कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर फ्लाइटचा मार्ग बदलून विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.