जम्मू काश्मीरमध्ये पूरामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शनिवारी आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांच्यासह राजनाथ सिंह यांनी या भागातील बारझुल्ला, रामबाग, जेलूम बंड, झीरो ब्रीज आणि अन्य भागांची पाहणी केली. दरम्यान, काश्मीरमधील या प्रलंयकारी पूरामुळे आतापर्यंत ८३ जण मृत्यमूखी पडले असून, तब्बल २६०० नागरिकांना या पुराचा फटका बसल्याची अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. जम्मू भागात तब्बल एक हजार गावकऱ्यांना पुराचा फटका बसला असून, या भागातील रस्ते , पूल आणि सार्वजनिक सेवांचे पूरामुळे नुकसान झाले आहे.
आणखी वाचा