पाकिस्तानला बसलेल्या पुराच्या तडाख्यात आत्तापर्यंत १३०० नागरिकांनी जीव गमावला आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य राबवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पुरामुळे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वासह दक्षिणेतील सिंध प्रांत पाण्याखाली गेला आहे.

भारतीय जवानांनी रक्तदान करत जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू

सिंध प्रांतात १८०, खैबर पख्तुन्वामध्ये १३८ तर बलुचिस्तानमध्ये १२५ जणांचा पुरामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील ‘जियो न्यूज’ने दिले आहे. या पुरामुळे १४ लाखांवर घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटात जवळपास सात लाखांहून जास्त प्राणी दगावले आहेत. या संकटात जगातील अनेक देशांकडून पाकिस्तानला मदत केली जात आहे. फ्रान्सने एका विशेष विमानातून पाकला शनिवारी मदत पाठवली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पाकिस्तानातील नुकसानाबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पुरामुळे तब्बल १० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

“शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…,” भाजपा मंत्र्याचं धक्कादायक विधान

पुराचा तडाखा बसलेल्या ७ लाख २३ हजार कुटुंबांना २५ हजारांची रोख मदत करण्यात आल्याची माहिती पाकिस्तान सरकारमधील मंत्री शाझिया मर्री यांनी दिली आहे. ‘बेनझीर इन्कम सपोर्ट प्रोग्राम’ अंतर्गत पीडितांना मदत केली जात असल्याचे मर्री म्हणाल्या आहेत. बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वा आणि सिंध प्रांतातील जवळपास पाच लाख लोक तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये राहत आहेत. या पुराने पाकिस्तानचा एक तृतियांश भाग व्यापला आहे. यामुळे जवळपास ३३ लाख लोकांना आर्थिक फटका बसला आहे.