मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे उत्तर पाकिस्तानात महापूर आला असून त्यात शनिवारी २४ लोक मरण पावले. परिणामी आतापर्यंत पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६ झाली आहे. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्य़ात तीन जण ठार झाले आहेत.
संपूर्ण जलमय झालेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चित्रल जिल्हय़ात बचाव पथकांनी शनिवारी आणखी २४ मृतदेह बाहेर काढल्याचे पोलिसांनी सांगितले. आधीच पाण्याखाली गेलेल्या या जिल्हय़ाला रविवारपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने रस्ते व पूल वाहून गेले आहेत.
भूकंपाचाही धक्का
उत्तर पाकिस्तानच्याच काही भागांना शनिवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेच्या या भूकंपात किमान तीन जणांचा बळी गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी इस्लामाबादच्या ईशान्येकडे २३ किलोमीटर अंतरावर होता व त्याची खोली १० किलोमीटर होती.
अबोटाबाद शहराच्या वेशीवरील एक घर भूकंपामुळे कोसळल्याने दोन महिलांसह ९ वर्षांचा एक मुलगा मरण पावला.
पाकिस्तानातील महापुरात ४६ जणांचा मृत्यू
मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे उत्तर पाकिस्तानात महापूर आला असून त्यात शनिवारी २४ लोक मरण पावले. परिणामी आतापर्यंत पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६ झाली आहे.
First published on: 26-07-2015 at 03:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood kill 46 in pakistan