मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे उत्तर पाकिस्तानात महापूर आला असून त्यात शनिवारी २४ लोक मरण पावले. परिणामी आतापर्यंत पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४६ झाली आहे. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्य़ात तीन जण ठार झाले आहेत.
संपूर्ण जलमय झालेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चित्रल जिल्हय़ात बचाव पथकांनी शनिवारी आणखी २४ मृतदेह बाहेर काढल्याचे पोलिसांनी सांगितले. आधीच पाण्याखाली गेलेल्या या जिल्हय़ाला रविवारपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने रस्ते व पूल वाहून गेले आहेत.
भूकंपाचाही धक्का
उत्तर पाकिस्तानच्याच काही भागांना शनिवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर ५.५ तीव्रतेच्या या भूकंपात किमान तीन जणांचा बळी गेला. भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी इस्लामाबादच्या ईशान्येकडे २३ किलोमीटर अंतरावर होता व त्याची खोली १० किलोमीटर होती.
अबोटाबाद शहराच्या वेशीवरील एक घर भूकंपामुळे कोसळल्याने दोन महिलांसह ९ वर्षांचा एक मुलगा मरण पावला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा