उत्तर प्रदेशातील बहुतेक नद्यांतील पाण्याची पातळी अचानक वाढू लागल्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े त्यातच धोक्याची पातळी ओलांडून वाहणाऱ्या राप्ती नदीला अभूतपूर्व पूर येण्याची शक्यता केंद्र शासनाकडूनही वर्तविण्यात आली आह़े त्यामुळे पूरस्थितीचे भय अधिकच गडद झाले आह़े नेपाळमधील भाडा, कौडियाला आणि गेरुआ या नद्यांना आलेल्या पुरामुळे या नद्यांचे पाणी वाढल्याचे अधिकृत अहवालांतून कळत़े अधिकृत अहवालांनुसार, राज्यात विविध ठिकाणी पुराशी संबंधित घटनांमध्ये गेल्या २४ तासांत १० जण मृत्युमुखी पडले आहेत़ यापैकी चौघे बहरैच प्रांतातील असून त्यातील दोन भावंडे आहेत, तर श्रावस्ती नदीत वाहून गेल्याने आणि पाण्याच्या माऱ्याने भिंत कोसळून शनिवारी ३ जण ठार झाले आहेत़ लखीमपूरमध्येही अशाच प्रकारे २ मृत्यू झाले आहेत़ पुरामुळे बहरैचमधील नांपारा आणि महसी तहसीलमध्ये सुमारे २५० घरे भुईसपाट झाली आहेत, तर १०३ गावांमधील तब्बल २.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आह़े शनिवारी रात्रीपासून एनडीआरएफच्या ४२ जवानांच्या चमूकडून येथे मदतकार्य सुरू करण्यात आले आह़े राप्तीसोबतच घाघ्रा आणि शरयू या नद्यांचीही पाण्याची पातळी प्रचंड वाढली आह़े त्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्ते आणि लोहमार्ग वाहतुकीवर परिणाम झाला आह़े राप्तीने उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्य़ात १०४.६२ मीटरची पातळी गाठली आह़े धोक्याच्या पातळीपेक्षा ती ०.६३ मीटरने अधिक आह़े यापूर्वी ११ सप्टेंबर २००० रोजी नदीने १०५.२५ मीटर इतकी विक्रमी पातळी गाठली होती़
असे नवी दिल्लीत केंद्रीय जलस्रोत मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आह़े केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार, या नदीची पातळी अजूनही सातत्याने वाढत आह़े अरुणाचलमध्ये भूस्खलन पावसामुळे अरुणाचलमधील अनेक जिल्ह्य़ांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत़ त्यामुळे येथील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आह़े कार्सिगसामार्गे भंडेरदेवा ते इटानगर हा मार्ग भूस्खलनामुळे रविवारी सलग तिसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद होता़ सी सेक्टरमध्ये भिंत कोसळून एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला आह़े दरम्यान, जम्मूतील राजौरी जिल्ह्य़ात ढगफुटीमुळे हुब्बी नदीला आलेल्या पुरात दोन बहिणी वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली़
उत्तरेत पुराचे भय; नद्यांचा रु द्रावतार
उत्तर प्रदेशातील बहुतेक नद्यांतील पाण्याची पातळी अचानक वाढू लागल्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े त्यातच धोक्याची पातळी ओलांडून वाहणाऱ्या राप्ती नदीला अभूतपूर्व पूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-08-2014 at 01:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation in up