हरियाणातील कैथलमध्ये जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेनं चापट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर येथील लोकांनी संबंधित आमदारासह कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केली आहे. आमदार ईश्वर सिंह हे चीका परिसरातील गुहला गावात पूरस्थितीची पाहणी करायला गेले होते. यावेळी गर्दीतून आलेल्या एका महिलेनं ईश्वर सिंह यांना चापट मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, मुसळधार पावसामुळे कैथल येथील घग्गर नदीवरील बंधारा फुटला आहे. यामुळे चीका परिसरातील काही गावांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार ईश्वर सिंह गुहला गावात आले होते. यावेळी एका महिलेनं आमदाराच्या कानशिलात लगावली. तसेच ‘तू आता कशाला आला?’ असा सवालही पूरग्रस्त महिलेनं विचारला आहे.

जेजेपी हा हरियाणामधील भाजपा सरकारचा सहकारी पक्ष आहे. सत्ताधारी पक्षातील आमदाराला महिलेनं कानशिलात लगावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जेजेपीचे आमदार ईश्वर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात मी कुठलंही कायदेशीर पाऊल उचलणार नाही. मी तिला माफ करतो, अशी प्रतिक्रिया ईश्वर सिंह यांनी ‘एएनआय’ला दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood victim woman slapped jjp mla ishwar singh in haryana viral video rmm
Show comments