गेल्या आठवड्यात झारखंडमध्ये घडलेल्या नाटमय घडामोडींमुळे देशभर चर्चा सुरू झाली. झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी रात्री ईडीनं अटक केली आणि मोठी खळबळ उडाली. हेमंत सोरेन यांनी त्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लागलीच त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्री चंपत सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर आज झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी ठरावावर मतदान पार पडलं. यावेळी हेमंत सोरेन यांनाही मतदान कामकाजात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली. यावेळी हेमंत सोरेन यांनी आपल्या भाषणात कारवाईबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले.
काय म्हणाले हेमंत सोरेन?
अटकेची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच हेमंत सोरेन विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले. तसेच, पहिल्यांदाच जाहीरपणे कारवाईच्या सर्व प्रकरणावर बोलत होते. यावेली त्यांनी ३१ जानेवारी हा लोकशाहीतला काळा अध्याय ठरल्याचं म्हटलं. “३१ जानेवारीचा काळा अध्याय, काळी रात्र देशाच्या लोकशाहीत नव्या पद्धतीने जोडली गेली आहे. ३१ तारखेला रात्री देशात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाली आहे. याआधी कुठल्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. या सगळ्या प्रकारात कुठे ना कुठे राज्यपालांचाही सहभाग आहे”, असा थेट आरोप हेमंत सोरेन यांनी विधानसभेत बोलताना केला.
२०२० पासून हेमंत सोरेन आरोपांच्या कचाट्यात; निवडणूक आयोगानेही केली होती अपात्रतेची शिफारस
“मी रडणार नाही. हे अश्रू योग्य वेळेसाठी वाचवून ठेवेन. तुम्हा लोकांसाठी अश्रूंची काहीच किंमत नाही. दलित, आदिवासींच्या अश्रूंची तुम्हाला काहीही किंमत नाही. वेळ आल्यानंतर आम्ही यांच्या एकेक प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे देऊ”, असा इशारा यावेळी हेमंत सोरेन यांनी विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाच्या आमदारांना उद्देशून दिला.
“…तर मी राजकारण सोडेन”
दरम्यान, आरोप सिद्ध झाले तर झारखंड सोडा, मी राजकारण सोडेन, असं जाहीर आव्हान सोरेन यांनी यावेळी दिलं. “८.५ एकर जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात मला अटक करण्यात आली. जर हिंमत असेल, तर सभागृहात कागदोपत्री पुरावा द्यावा की ही जमीन माझ्या नावावर आहे. जर तशी असेल, तर मी राजकारण सोडेन. जेव्हा सरळ मार्गाने माझा पराभव करू शकले नाहीत, तेव्हा अशा प्रकारे मागच्या दाराने पाठीवर वार केला”, अशी टीका हेमंत सोरेन यांनी यावेळी विरोधकांवर केली.
“मला याची शक्यता वाटतच होती. यांच्यात दडून बसलेला द्वेष दररोज व्यक्त होत होता. यांच्या वक्तव्यांमधून, यांच्या वर्तनातून. पण आम्ही पराभव मान्य केलेला नाही. त्यांना वाटतं की मला तुरुंगात टाकून हे त्यांच्या कारस्थानात यशस्वी होतील. पण तसं होणार नाही. हे झारखंड आहे. हे देशातलं असं राज्य आहे, की जिथे आदिवासी, दलित, मागास वर्गातल्या अगणित लढवय्यांनी इथल्या सामान्य आदिवासी-दलितांचा जीव वाचवला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याचं स्वप्नही यांनी पाहिलं नव्हतं तेव्हापासून झारखंडचे आदिवासी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आहेत. हे तर फार नंतर आले. आजपर्यंत या लोकांनी गांधी टोपी घातलेली नाही”, असंही हेमंत सोरेन यावेळी म्हणाले.
“एका आदिवासी मुख्यमंत्र्यानं पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा अशी भाजपाची इच्छा नाही. त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी हे घडू दिलेलं नाही”, असा गंभीर आरोपही हेमंत सोरेन यांनी भाषणात केला.