दक्षिण रशियामध्ये रोस्तोव-ऑन-डॉन येथे शनिवारी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेतील ६२ मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. फ्लाईदुबई या कंपनीचे बोईंग ७३८ हे विमान होते. दुबईहून रशियात दाखल झालेले हे प्रवासी विमान विमानतळावर उतरत असताना कोसळले. यामध्ये विमानातील सर्व ६२ जणांचा मृत्यू झाला. अद्याप दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनातील अधिकारी मार्टिना कोस्तिकोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून रोस्तोव-ऑन-डॉन विमानतळावर दाखल झालेले प्रवासी विमान उतरत असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader