दक्षिण रशियामध्ये रोस्तोव-ऑन-डॉन येथे शनिवारी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेतील ६२ मृतांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. फ्लाईदुबई या कंपनीचे बोईंग ७३८ हे विमान होते. दुबईहून रशियात दाखल झालेले हे प्रवासी विमान विमानतळावर उतरत असताना कोसळले. यामध्ये विमानातील सर्व ६२ जणांचा मृत्यू झाला. अद्याप दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनातील अधिकारी मार्टिना कोस्तिकोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईहून रोस्तोव-ऑन-डॉन विमानतळावर दाखल झालेले प्रवासी विमान उतरत असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर विमानाला आग लागल्याचे त्यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा