पॅरिसहून बंगळुरूला येत असलेल्या एअर फ्रान्सच्या विमानातील एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. विमान हवेत उडत असताना एक प्रवासी आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विमानातील इतर प्रवासी घाबरले. विमान बंगळुरूत उतरल्यानंतर या आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. व्यंकट मोहित पाथीपती (२९) असं या प्रवाशाचं नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील रहिवासी आहे.

आरोपी व्यंकट मोहित पाथीपती हा अमेरिकेतील एका किराणा कंपनीत डेटा इंजिनिअर म्हणून काम करतो. तो बंगळुरुतील नागवारा येथे राहणाऱ्या त्याच्या चुलतीला भेटायला अमेरिकेहून बंगळुरूला जात होता. याच प्रवासादरम्यान, त्याने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Nivali-Haatkhamba villagers protest demanding cancellation of flyover at Nivali
निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी-हातखंबा ग्रामस्थांचे आंदोलन
central minister nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर माफी, म्हणाले…
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
mh 370 flight
१० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
Tanmay Deshmukh from Yavatmal appointed as Lieutenant in Indian Army at age of 23
२३ व्या वर्षी ‘लेफ्टनंट’पदी नियुक्ती, यवतमाळचा तन्मय सर्वात कमी वयाचा…
pimpri woman steals jewellery marathi news
पिंपरी : मुलाला दवाखान्यात घेऊन जाताना दरवाजा बंद करण्याचे विसरले; शेजारणीने सव्‍वासहा लाखांचे दागिने लांबविले

एअर फ्रान्सच्या एका कर्मचाऱ्याने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी व्यंकट मोहित विरुद्ध विमान अधिनियम-१९३७ आणि भारतीय दंड विधानाच्या कलम ३३६ (इतरांच्या जीवाला किंवा स्वतःच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारं कृत्य केल्यामुळे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी व्यंकट मोहितला जामिनावर सोडून दिलं आहे. मोहित हा उच्चशिक्षित असून त्याने एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून बिझनेस अ‍ॅनालिटिक्स अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. तो सध्या एका अमेरिकन कंपनीत काम करत आहे.

हे ही वाचा >> मणिपूर : दोन महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी ‘इतक्या’ जणांना अटक, अन्य आरोपींचा शोध सुरु

चौकशीदरम्यान, पोलिसांनी व्यंकट मोहितला विचारलं की, उडत्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न का केलास? त्यावर व्यंकट म्हणाला, मी फक्त दरवाजा नीट उघडतोय का आणि बंद होतोय का ते तपासत होतो.

Story img Loader