भारतात पहिल्यावहिल्या खासगी बँकेचे आज उद्घाटन झाले. मोदी सरकारच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या बंधन बँकेचे उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याहस्ते करण्यात आले.
कोलकाता येथील सायन्स सिटी सभागृहात बंधन बँकेचे व्यावसायिक बँकींग ऑपरेशन सुरू करण्यात असून, या बँकेच्या बँकेच्या देशभरात ५०० शाखा सुरू करण्यात येणार आहेत. बॅंकेने शहरी भागात २५० एटीएमची सोय केली आहे. बंधनकडे सध्या १६००० कर्मचारी कार्यरत आहेत. कोलकाता येथे लघु वित्त पुरवठा करणाऱया बंधन फायनान्स सर्व्हिसेसला गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेकडून सामान्य बँक सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली होती.
अर्थमंत्री जेटलींच्या हस्ते ‘बंधन बँकेचे’ उद्घाटन
मोदी सरकारच्या महत्त्चकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बंधन बँकेचे उद्घाटन आज केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याहस्ते करण्यात आले.
First published on: 23-08-2015 at 03:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fm arun jaitley inaugurates bandhan bank