जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यावर गुरुवारी हैदराबादमधील एका कार्यक्रमात चप्पल भिरकावण्यात आली. ‘भारत माता की जय’ म्हणत एका व्यक्तीने कन्हैया कुमारकडे चप्पल फेकली. पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्याला अटक केली आहे.
कन्हैया कुमारचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात अनेक लोक उपस्थित होते. त्याचे भाषण सुरू असतानाच त्याच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रकार घडला. उपस्थितांनी लगेचच चप्पल फेकणाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसांकडे दिले.
कन्हैया कुमारने बुधवारी दुपारी हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली. चालू महिन्यात तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने रोहित वेमुला त्याचे आदर्श असल्याचे म्हटले होते. कन्हैया कुमार याने बुधवारी सायंकाळी रोहित वेमुलाचे मित्र आणि समर्थकांना भेटण्याची योजना आखली आहे. त्यांच्या मागण्या कुलगुरू अप्पाराव पोडिले यांनी फेटाळून लावल्या आहेत. रोहित वेमुला समर्थक विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या कार्यालयाला घेराव केला. त्यांना सहा तास बाहेर निघू दिले नाही. विद्यार्थ्यांनी कार्यालयाची मोडतोड व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा