लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला स्वयंघोषित संत आसाराम बापू याला जामीन मंजूर करावा इतकी तातडीची वैद्यकीय उपचारांची गरज नाही आणि त्याला विशेष वागणूक देता येऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. आसाराम बापूने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वैद्यकीय चाचणी करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
आसाराम बापूला जोधपूरहून दिल्लीत कसे आणावे याबाबत आदेश देण्यास न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने नकार दिला. या बाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असेही पीठाने म्हटले आहे.
विविध कैद्यांसाठी विविध प्रकारचे निकष असू शकतात का, प्रथम वैद्यकीय अहवाल येऊ दे, सध्या तातडीची वैद्यकीय गरज नाही, हा वैद्यकीय समस्येपेक्षाही वाढत्या वयोमानाचा प्रश्न आहे, असे पीठाने म्हटले आहे.

Story img Loader