सरकारी कागदपत्रांसाठी आपली सर्व माहिती देणे आवश्यक असते. आपली ओळख पटविण्यासाठी आपल्या नावाबरोबरच अडनाव, आई आणि वडिलांचे नाव आवश्यक असते. पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असून ते काढण्यासाठीही आपली सर्व माहिती द्यावी लागते. मात्र आता त्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आपली ओळख पटवण्यासाठी आता वडिलांच्या नावाचा संदर्भ देण्याची आवश्यकता नाही. आयकर विभागाने या नव्या नियमाबाबत माहिती दिली असून या नव्या नियमामुळे येत्या काळात ही सर्व प्रक्रिया काही प्रमाणात सोपी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यांचे आई-वडिल विभक्त झाले असतील त्यांना पॅनकार्ड काढण्यासाठी काही अडचणी येत असत. पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव बंधनकारक असल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागाने अशा लोकांना पॅन कार्ड काढण्यासाठी वडिलांचे नाव देण्याचा नियम शिथिल केला आहे. याअंतर्गत आयकर विभागाने आयकर काद्यातील ११४व्या नियमात बदल करत पॅन कार्डसाठी वडिलांऐवजी आईचे नाव देण्यास मान्यता दिली आहे किंवा वडिलांच्या नावाचा संदर्भ देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनाथ मुले किंवा इतरही अनेकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. हा नवीन नियम येत्या ५ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे सिंगल पॅरेंट असणाऱ्यांनाही अडचणी येणार नाहीत.