भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २००९ मध्ये, अमित शहा यांनी  ‘साहेबां’च्या आदेशावरून, पोलीस यंत्रणेचा वापर एका युवतीवर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी अवैध पद्धतीने केला होता, असे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ, अमित शहा आणि गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी जी.एल. सिंघल या दोघांमधील सुमारे अर्ध्या तासाचे दूरध्वनी संभाषणाचे ध्वनिमुद्रण आरोपकर्त्यांनी सादर केले आहे. इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला सदर ध्वनीमुद्रण दिल्याचा दावाही आरोपकर्त्यांनी केला आहे.
या ध्वनिमुद्रणामध्ये, शहा यांनी सिंघल यांना ‘माधुरी(नाव बदलेले) या तरुणीच्या हालचालींवर लक्ष ठेवावे’ असे सांगितल्याचे ध्वनिमुद्रणातून स्पष्ट होत आहे. ‘कोब्रापोस्ट’ आणि ‘गुलैल’ या वृत्तसंकेतस्थळांनी हे आरोप केले आहेत. सिंघल यांना इशरत जहाँ चकमक प्रकरणी सिंघल यांना सीबीआयने २००४ मध्ये अटक केली होती. त्यांनी सीबीआयकडे २६७ ध्वनिमुद्रणे हस्तांतरीत केली. हे ध्वनिमुद्रण हा त्यातीलच भाग असल्याचे वृत्तसंकेतस्थळांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री मोदी यांची भावनगर महापालिकेच्या एका कार्यक्रमादरम्यान ‘त्या’ तरुणीशी भेट झाली असल्याचा दावाही आरोपकर्त्यांनी केला आहे.
हे ध्वनिमुद्रण प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच मुलीच्या वडिलांनी मुलगी आईच्या उपचारांसाठी अहमदाबादेत आली असून तिची काळजी वाटते, म्हटले आह़े  दरम्यान, ‘सद्यस्थितीत आपले दावे स्वतंत्रपणे सिद्ध करण्यायोग्य साधने नसल्याचे’ दोन्ही वृत्तसंकेतस्थळांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा