अमित शहा यांचा फोंड्यातील प्रचारसभेत मतदारांना सवाल
गोव्याच्या विकासासाठी भाजपच राजकीय स्थैर्य देऊ शकतो असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांपुढे भाजपचा सुवर्ण गोव्याचा विचार किंवा काँग्रेसचा गांधी परिवाराचा गोवा असे निवडीचे पर्याय आहेत, असे शहा यांनी नमूद केले.
दक्षिण गोव्यातील फोंडा येथे शहा यांची रवी नाईक यांच्या प्रचारार्थ सभा झाली. नाईक हे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. यावेळी शहा यांनी गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले. गांधी कुटुंबीयांना गोव्यात सुटीला येण्याची सवय आहे. त्यामुळे सुटीसाठी त्यांना पर्यटनस्थळ हवे आहे. मात्र भाजपसाठी गोवा विकासाचे माध्यम आहे. त्यामुळे जनतेने निवड करायची आहे असे त्यांनी नमूद केले.
गोव्याबाहेरील काही पक्ष रिंगणात उतरले आहेत. मात्र ते विकास करू शकणार नाहीत. काही पक्ष निवडणुकीपूर्वी मोठ्या घोषणा करतात मात्र निवडून येणार नसल्याची खात्री असल्याने आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रश्नच नाही असा टोला शहा यांनी लगावला. तृणमूल काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष गोवा विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. शहा यांचा रोख या पक्षांकडे होता. गोव्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भाजपने काम केल्याचे शहा यांनी नमूद केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शहा यांनी कौतुक केले.