मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे महत्त्वाचे विरोधक आणि कठोर टीकाकार अ‍ॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल रशियात तिसऱ्या दिवशीही शोक व्यक्त केला जात आहे. रशियात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. रविवारीही ४०० पेक्षा जास्त नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाल्नी यांच्या मृत्यूमुळे रशियात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनांना मोठा धक्का बसला आहे. देशात सर्वत्र आक्रोश आणि दु:खाचे वातावरण असून अनेकजण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे अध्यक्ष पुतिन यांना नवाल्नी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. नवाल्नी यांच्यावर यापूर्वी विषप्रयोग झाला होता तसेच त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकण्यात आले होते.

अनेक ठिकाणी लोकांनी निदर्शने करताना पुतिन यांना खलनायकाच्या स्वरूपात दाखवले. काही निदर्शकांनी त्यांचा उल्लेख ‘खुनी’ असा केला तर काही जणांनी ‘आम्ही घाबरणार नाही’ असा इशारा पुतिन यांना दिला.   रशियातील विविध शहरांमध्ये पोलिसांचा दबाव झुगारून लोक नवाल्नी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. शनिवारी १७७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तरीही रविवारी लोक न घाबरता बाहेर येत होते. दरम्यान, नवाल्नी यांच्या पत्नी युलिया यांनी रविवारी त्यांच्या कुटुंबाचे छायाचित्र प्रसिद्ध केले. अनेकांनी ते समाजमाध्यमांवर सामायिक केले.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा