मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे महत्त्वाचे विरोधक आणि कठोर टीकाकार अॅलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूबद्दल रशियात तिसऱ्या दिवशीही शोक व्यक्त केला जात आहे. रशियात ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. रविवारीही ४०० पेक्षा जास्त नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवाल्नी यांच्या मृत्यूमुळे रशियात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनांना मोठा धक्का बसला आहे. देशात सर्वत्र आक्रोश आणि दु:खाचे वातावरण असून अनेकजण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे अध्यक्ष पुतिन यांना नवाल्नी यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवत आहेत. नवाल्नी यांच्यावर यापूर्वी विषप्रयोग झाला होता तसेच त्यांना अनेकवेळा तुरुंगात टाकण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in