नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’तील घटक पक्षांतील जागावाटपाच्या वाटाघाटींना या आठवडय़ापासून गती मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच, अन्य राज्यांतील प्रदेशाध्यक्ष व प्रभारींशी पक्षांतर्गत बैठक घेतल्या आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ४ जानेवारी रोजी काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठका होत असून त्यामध्ये जागावाटप, जाहीरनामा व भारत न्याय यात्रेचा आराखडा निश्चित केला जाणार आहे.
दिल्लीत झालेल्या ‘इंडिया’च्या बैठकीमध्ये घटक पक्षांनी जागावाटपावर वर्षांअखेरीपर्यंत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, जागावाटपाबाबत पक्षांतर्गत चर्चा केल्याशिवाय घटक पक्षांशी बोलणी न करण्याचे काँग्रेसने ठरवले होते. काँग्रेसने नेमलेल्या महासचिव मुकुल वासनिक यांच्या राष्ट्रीय आघाडी समितीने गेल्या शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांमध्ये विविध राज्यांतील पक्षाच्या नेत्यांशी दिल्लीत बैठका घेतल्या. त्याचा अहवाल खरगेंना सादर केला जाणार असून त्याआधारे गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्षांशी होणाऱ्या बोलणीमध्ये वेगवेगळय़ा राज्यांमध्ये काँग्रेसने किती जागांवर दावा सांगायचा हेही निश्चित केले जाऊ शकेल.
हेही वाचा >>>जपानमध्ये किनारपट्टीच्या भागात डझनभरहून अधिक भूकंपाचे धक्के, घरांचं नुकसान, रस्त्यांना भेगा अन्…
महाराष्ट्रात शिवसेना-ठाकरे गट व काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटपाचा वाद तीव्र झाला आहे. दिल्लीतील ‘इंडिया’च्या बैठकीवेळी उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांची चर्चा झाली होती. त्यानंतर राहुल गांधी व शरद पवार यांच्यामध्येही बैठक झाली होती. पंजाबमध्ये प्रदेश काँग्रेसचे नेते स्वतंत्र लढण्याचा पर्याय देत आहेत. दिल्लीमध्ये ‘आप’शी जागांची बोलणी करण्यावरही निर्णय घ्यावा लागणार आहे. राहुल गांधी व खरगे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील नेत्यांशीही सल्लामसलत केली आहे. बैठकीनंतर ‘इंडिया’तील घटक पक्षांशी वाटाघाटी होतील.
भारत न्याय यात्रा, जाहीरनाम्यावरही चर्चा
खरगेंनी बोलावलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित राहणार असून लोकसभा निवडणुकीच्या तयारीसह ‘भारत न्याय यात्रे’संदर्भातील तपशीलही निश्चित केला जाणार आहे. या यात्रेचा नेमका मार्ग, बोधचिन्ह तसेच, १४ राज्यांतील रुपरेखा या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे. याशिवाय, काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या जाहीरनामा समितीचीही गुरुवारी बैठक होणार आहे.