अमेरिकेतील खलिस्तानी कट्टरवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्तेचा कट रचल्याचा आरोप ठेवून अमेरिकेच्या आदेशानंतर चेक प्रजासत्ताकच्या अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ताला अटक करण्यात आली होती. आता गुप्ताच्या परिवारातर्फे भारतीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकेतून केली आहे. तसेच याचिकेद्वारे कुटुंबियांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. निखिल गुप्ता हा दिल्ली येथील व्यावसायिक असून त्याला चुकीच्या मार्गाने अटक करण्यात आली आहे, तसेच त्यांच्याशी कुटुंबियांचा संपर्क होऊ दिला जात नाही. गुप्ता यांच्या मुलभूत अधिकाचे उल्लंघन झाले असल्याचे कुटुंबियांनी याचिकेत म्हटले आहे.
निखिल गुप्ता यांची अटक आणि चौकशी एखाद्या हॉलिवूड स्पाय थ्रिलरपटाला शोभावी अशी आहे. ३० जून रोजी निखिल गुप्ता चेक प्रजासत्ताकच्या प्रागमधील विमानतळावर उतरले असता त्यांना अमेरिकन एंजट्सनी बळजबरीने काळ्या रंगाच्या एसयुव्हीमध्ये कोंबले आणि तीन तास प्राग शहरात फिरवत फिरवत त्यांची चौकशी केली. यावेळी एजंट्सनी त्यांचा मोबाइलही ताब्यात घेतला होता.
हे वाचा >> कोण आहे निखिल गुप्ता? खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा अमेरिकेचा आरोप
हिंदू असूनही गोमांस खाण्यास दिले
निखिल गुप्ता यांना अटक करताना वॉरंट देण्यात आले नाही. तसेच चेक प्रजासत्ताकच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी अटक करण्याऐवजी अमेरिकी एजंट्सनी गुप्ता यांना ताब्यात घेतले. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, अटक झाल्यापासून गुप्ता यांना एकांतवासात ठेवण्यात आले आहे. तसेच निखिल गुप्ता हे हिंदू धर्माचे आचरण करणारे आहेत. तरीही त्यांना पहिल्या १० ते ११ दिवसांत गोमांस आणि डुकराचे मांस खाण्यास दिले जात होते. त्यांना शाकाहारी जेवण दिले जात नाही. गुप्ता यांच्या धार्मिक हक्कांचे हे उल्लंघन आहे.
कुटुंबियांच्या जीविताला धोका
गुप्ता यांच्या कुटुंबियांनी याचिकेत सांगितले की, गुप्ता यांना आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी भीती घातली जात आहे. प्रागमध्ये गुप्ता यांना अटक करण्यात आल्यानंतर चेक प्रजासत्ताकच्या यंत्रणेने भारतीय दुतावासाला अटक किंवा ताब्यात घेतल्याची माहिती दिली नाही. तसेच परकीय भूमित एखाद्याला अटक केल्यानंतर लगेचच त्यांना काऊंसल एक्सेस द्यावा लागतो. त्यासाठीही २० दिवसांचा उशीर लागला, असाही आरोप करण्यात आला आहे.
आणखी वाचा >> निखिल गुप्ताला त्याच्याविरुद्धचा फौजदारी गुन्हा हटवण्याचे आश्वासन; अमेरिकेच्या सरकारी वकिलांचा न्यायालयात आरोप
कोण आहे निखिल गुप्ता?
अमेरिकेच्या न्याय विभागाने छापलेल्या पत्रकाप्रमाणे निखिल गुप्ता हा ५२ वर्षीय भारतीय नागरिक आहे. एका आरोपात याच वर्षी निखिल गुप्ताला ३० जून रोजी अटक करण्यात आली. निखिल गुप्ताने एका कथित भारतीय सरकारी कर्मचाऱ्याची चर्चा केली होती. त्या भारतीय अधिकाऱ्याची नोंद कुठेच नाही त्याला CC-1 म्हणून संबोधलं जातं. निखिल गुप्ताने अमेरिकेत एका वकिलाची आणि राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्याची हत्या करण्याचा कट रचला होता असंही या पत्रकात म्हटलं आहे. निखिल गुप्ताने त्यासाठी CC1 शी चर्चा केली होती.
जूनमध्ये निखिल गुप्ताला हे कुणाची हत्या करायची आहे हे CC1 कडून सांगितलं गेलं. ही माहिती त्याने कथित हिटमॅनकडे पोहचवली होती. अमेरिकेच्या दस्तावेजात हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचाही उल्लेख आहे. निखिल गुप्ताने कथित हिटमॅनला निज्जर कुठे गेला आहे ते सांगितलं होतं.