अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला केंद्र सरकारने विदेशी देणग्यांसंदर्भात प्रश्नावली पाठविली आहे. याद्वारे त्यांना देणग्यांबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांपुढे आव्हान ठरणाऱया आम आदमी पक्षापुढे अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आम आदमी पक्षाला १९ कोटींची देणगी!
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “केंद्राकडून त्यांना प्रश्नावली पाठविण्यात आलेली आहे. आम्ही पाठविलेल्या प्रश्नावलीचे अद्याप कोणतेही उत्तर आम आदमी पक्षाकडून आलेले नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.”
परदेशी विद्यापीठातील स्वयंसेवकांचा केजरीवालांच्या ‘आप’ला हात
दिल्लीत गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या प्रशासनावर टीका करत काँग्रेसची सालटी सोलण्यास केजरीवालांनी सुरुवात केली असताना, दिक्षित यांनी आम आदमीला मिळालेल्या विदेशी देणग्यांच्या मुद्द्यावर केजरीवालांना निशाण्यावर धरले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
‘आम आदमी’ला केंद्राकडून प्रश्नावली; विदेशी निधीची चौकशी सुरू
दिल्लीत गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या प्रशासनावर टीका करत काँग्रेसची सालटी सोलण्यास केजरीवालांनी सुरुवात केली असताना
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-11-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign funding probe government sends questionnaire to arvind kejriwals aam aadmi party