India on Bangladesh Political Crisis: शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यामुळे बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांनी अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली असताना आंदोलक मात्र अद्याप काही ठिकाणी जाळपोळ वा नासधूस करताना दिसत आहेत. या आंदोलकांना शांत करण्यासाठी आता बांगलादेशचं लष्कर रस्त्यांवर उतरलं आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थितीचा भारतावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून आज सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी बांगलादेशमधील स्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपण या प्रसंगात सरकारच्या पाठिशी असल्याचं नमूद केलं. तसेच, यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उत्तरं दिली. या बैठकीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे नेते टी. आर. बालू, जदयूचे लल्लन सिंह, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय व डॅरेक ओब्रायन, राष्ट्रीय जनता दलाकडून मिसा भारती, शिवसेना उबाठा गटाचे अरविंद सावंत, बिजू जनता जलाचे सस्मित पात्रा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व तेलुगू देसम पक्षाचे राम मोहन नायडू उपस्थित होते.

sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य
bangladesh political crisis sheikh hasina resigned
बांगलादेशच्या इतिहासात राजकीय अस्थिरता काही नवी नाही! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बांगलादेशच्या मुद्द्यावर काय झाली चर्चा?

यावेळी बांगलादेशच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. “सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत बांगलादेशमधील घडामोडींसंदर्भात माहिती देण्यात आली. सर्व पक्षांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या भूमिकेच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार”, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. सोबत त्यांनी बैठकीतील काही फोटोही शेअर केले आहेत.

राहुल गांधींनी लोकसभेतील चर्चेदरम्यान बांगलादेशमधील घडामोडींसाठी परकीय शक्ती जबाबदार असल्याची काही माहिती आपल्याकडे आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर जयशंकर यांनी “आमच्याकडे फक्त पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने बांगलादेशमधील आंदोलनाचं समर्थन करणारा डीपी ठेवला होता अशी माहिती आहे”, असं उत्तर दिलं. तसेच, “बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असण्याची शक्यता आहे”, अशी माहितीही जयशंकर यांनी बैठकीत दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

शेख हसीना यांची पुढची योजना काय?

दरम्यान, या बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. “भारत सरकारनं यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातली माहिती आत्ताच उघड करता येणार नाही”, असं जयशंकर यांनी सांगितलं.

Who is Nahid Islam: कोण आहे नाहिद इस्लाम? शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थी आंदोलनाचे केले नेतृत्व

भारत सरकार बांगलादेश लष्कराच्या संपर्कात

याव्यतिरिक्त भारक सरकार बांगलादेशच्या लष्कराशी संपर्कात असून भारतीय लष्करालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत दिली. “आपल्या देशाची सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत”, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. “जर बांगलादेशमधील परिस्थिती आणखीन चिघळली, तर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी भारत सरकार सज्ज आहे”, असं ते म्हणाले.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या गोंधळात सीमेपलीकडून किती बांगलादेशी भारतात आले आहेत यासंदर्भात विचारणा केली. मात्र, त्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती आपल्याकडे नाही, असं उत्तर परराष्ट्रमंत्र्यांनी दिलं.