एस जयशंकर या महिन्याच्या अखेरीस शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. पाकिस्तानात जाणारे ते गेल्या नऊ वर्षांतील पहिले परराष्ट्र मंत्री ठरतील. सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये शेवटची भेट दिली होती.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

“परराष्ट्र व्यवहार मंत्री आमच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी इस्लामाबाद येथे होणाऱ्या SCO शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जातील”, असं जयस्वाल म्हणाले. ते पुढे म्हणाले, ही भेट शिखर परिषदेला उपस्थित राहण्यापुरती मर्यादित असेल. ऑगस्टमध्ये पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीसाठी आमंत्रित केले होते.

हेही वाचा>> लेबनॉनमधून सीरियात जाणारा मार्ग उद्ध्वस्त; इस्रायलचे लेबनॉनच्या दक्षिणेकडे जोरदार हवाई हल्ले

भारत पाकिस्तान संबंध

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर बालाकोट हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक चिघळले होते. त्यामुळे जयशंकर यांना शिखर परिषदेसाठी पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय म्हणून पाहिला जात आहे. कारण भारतानेही पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळाला लक्ष्य केले होते. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यास पाकिस्तानने जोरदार विरोध केल्यानंतर हे संबंध आणखी ताणले गेले. भारताने या मुद्द्यावर पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर वारंवार टीका केली आहे आणि ही अंतर्गत बाब असल्याचा पुनरुच्चार केला आहे. 

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता की त्यांचे सीमेपलीकडील दहशतवादाचे धोरण कधीही यशस्वी होऊ शकत नाही आणि त्यांच्या आर्थिक संकटाचाही इशारा दिला होता. “अनेक देश त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितींमुळे मागे राहतात. आपला शेजारी देश पाकिस्तान दुर्दैवाने त्यांच्या चुकीच्या कृत्यांचा इतरांवर, विशेषत: शेजारच्या भागावर परिणाम होतो”, असंही जयशंकर यांनी सुनावलं होतं.

एससीओच्या शिखर परिषदेला कोणते देश जाणार?

एससीओ वचनबद्धता पाळण्याकरता जयशंकर हे देशातील शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यामुळे प्रादेशिक सुरक्षा सहकार्याला चालना मिळणार आहे. सुषमा स्वराज २०१५ मध्ये अफगाणिस्तानवरील परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या.  भारताव्यतिरिक्त, SCO मध्ये चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे सदस्य देश आहेत आणि ते एक प्रभावशाली आर्थिक आणि सुरक्षा गट तसेच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय संघटनांपैकी एक आहेत.