इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भेटीदरम्यान केलेल्या पेहरावामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या ट्विटरकरांच्या टीकेचे लक्ष्य झाल्या आहेत. हसन रोहानी यांच्या भेटीवेळी सुषमा स्वराज यांनी गुलाबी रंगाची साडी आणि डोके झाकण्यासाठी त्याच रंगाची शाल असा पेहराव केला होता. मात्र, स्वराज यांना अशाप्रकारे डोके झाकण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. इराणमध्ये महिलांना पूर्ण शरीर झाकण्याची सक्ती आहे. यापूर्वी २०१४ मध्ये युरोपीय महासंघाच्या परराष्ट्रमंत्री इमा बोनियो यांनादेखील तेहरान विमानतळावर दाखल झाल्यानंतर डोक्यावर स्कार्फ घेण्याची विनंती करण्यात आली होती. सुरूवातीला त्यांनी असे करण्यास नकार दिला होता. मात्र, इराणने भेट रद्द करण्याची धमकी दिल्यानंतर त्याने डोक्यावर स्कार्फ घेण्याचे मान्य केले होते.

Story img Loader