पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी महत्त्वाचे असे परराष्ट्रमंत्रिपद स्वत:कडे ठेवले असून माजी मंत्री सरताज अझीज हे भारत व अमेरिका संबंधांवर शरीफ यांचे सल्लागार असणार आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र संबंध सल्लागार म्हणून अझीज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंतर्गत सुरक्षामंत्री निसार अली खान हे नवीन सरकारमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न तसेच तालिबानी दहशतवादाचा मुकाबला यावर निर्णय घेतील. झहीद हमीद – कायदा व न्याय तर शहीद खाकन अब्बासी – पेट्रोलियम व नैसर्गिक स्रोत, अब्दुल कादिर बलोच – राज्ये व सरहद्दीचे भाग, इशाक दर -अर्थ व महसूल, ख्वाजा साद रफीक – रेल्वे, गुलाम मूर्तझा जतोई – उद्योग व उत्पादन, बिरजी ताहीर – काश्मीर व गिलगीट कामकाज, परवेझ रशीद -माहिती व प्रसारण, कमरान मायकेल – बंदरे व जहाज वाहतूक, सदरूद्दीन रशीदी – परदेशातील पाकिस्तानी कामकाज या प्रमाणे खातेवाटप करण्यात आले आहे. कॅप्टन (निवृत्त) शुजात अझीम यांना पंतप्रधानांचे हवाई वाहतूक सल्लागार, पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाचे नेते सनाउल्ला झेहरी व माजी राजदूत तारिक फातेमी यांना पंतप्रधानांचे खास सहायक नेमण्यात आले आहे.
शरीफ यांच्याकडेच परराष्ट्रमंत्रिपद
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी महत्त्वाचे असे परराष्ट्रमंत्रिपद स्वत:कडे ठेवले असून माजी मंत्री सरताज अझीज हे भारत व अमेरिका संबंधांवर शरीफ यांचे सल्लागार असणार आहेत. पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र संबंध सल्लागार म्हणून अझीज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
First published on: 09-06-2013 at 03:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign ministry is with nawaz sharif