नोव्हेंबर महिन्यात भारताला सात लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली अस,ून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्य़ांनी अधिक आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात दिवाळी आणि ख्रिस्मसचा माहोल असतो. तसेच बहुतांश भागात थंडी पसरत असल्यानेही वातावरण प्रसन्न असते. त्यामुळे या महिन्यांत परदेशी पर्यटकांचा ओघ मोठय़ा प्रमाणात असतो. यंदाच्या नोव्हेंबरात सहा लाख ९० हजार परदेशी पर्यटकांनी भारतवारी केली. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरात ही संख्या सहा लाख ७० हजार होती. अर्थात परकीय चलन हस्तांतरण व्यवहारातून झालेल्या कमाईत २२.४ टक्के वाढ झाली आहे. भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने व्हिसासंबंधित र्निबध बऱ्याच प्रमाणात सोपे आणि शिथिल केले आहेत.
भारतात परदेशी पर्यटकांमध्ये ३ टक्के वाढ
नोव्हेंबर महिन्यात भारताला सात लाख परदेशी पर्यटकांनी भेट दिली अस,ून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्य़ांनी अधिक आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात दिवाळी आणि ख्रिस्मसचा माहोल असतो.
First published on: 11-12-2012 at 05:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign tourist increased by 3 in india