दिल्लीचे माजी मंत्री संदीपकुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. संदीपकुमार आक्षेपार्ह सीडी समोर आल्यानंतर अडचणीत सापडले होते. एका महिलेसोबत संदीपकुमार आक्षेपार्ह कृत्य करताना या व्हिडीओत दिसत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सीडी समोर आल्यानंतर संदीपकुमार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती. दरम्य़ान शनिवारी व्हिडीओत दिसणारी वादग्रस्त महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. संदीपकुमार यांनी रेशनकार्ड देण्याचे आमीष दाखवून माझे लैंगिक शोषण केले असा गंभीर आरोप पीडित महिलेने केले होते. संदीपकुमार यांच्या व्हिडीओत दिसणा-या महिलेने शनिवारी दुपारी दिल्लीतील सुलतानपूरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Story img Loader