इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षात मिया खलिफाने उडी घेणं आणि त्यातही पॅलेस्टाईनची बाजू घेणं मिया खलिफाला भोवलं आहे. एका महत्त्वाच्या डीलमधून मिया खलिफाची हकालपट्टी करण्यात आली आहे. इस्रायल गाझा युद्धाबाबत मिया खलिफाने X या सोशल मीडिया हँडलवर काही पोस्ट केल्या होत्या. त्या खटकल्याने आता मियाची एका महत्त्वाच्या डीलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कॅनेडियन ब्रॉडकास्टर आणि रेडिओ होस्ट टॉड शापिरोसह तिची एक बिझनेस डील होणार होती. ज्यातून तिला हाकलण्यात आलं आहे. शापिरोनेही पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
शापिरो आणि मिया खलिफा यांच्यातली डील जवळपास फायनल
शापिरो आणि मिया खलिफा यांच्यातली बिझनेस डील जवळपास फायनल झाली होती. मात्र मियाने एक्सवर ज्या पोस्ट केल्या त्यानंतर तिला या डीलमधून हाकलण्यात आलं आहे. शापिरोने एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की मिया खलिफाने केलेल्या पोस्ट भयंकर आहेत, घृणास्पद आहेत. तिने पुढे जाऊन जरा स्वतःला माणूस होता येईल का ते बघावं. इस्रायलमध्ये लोकांना ठार केलं जातं आहे, ओलीस ठेवलं जातं आहे, महिलांवर बलात्कार केले जात आहेत. अशा सगळ्या गोष्टी समोर दिसत असताना मिया खलिफा अशा पोस्ट कशा काय करु शकते? असा सवाल शापिरोने विचारला आहे आणि तातडीचा निर्णय घेत तिची डीलमधून हकालपट्टी केली आहे.
मिया खलिफाने काय म्हटलं आहे?
शापिरोने डील रद्द केल्यानंतर आता मिया खलिफाचंही म्हणणं समोर आलं आहे. तिने एक्सवर आपलं म्हणणं मांडत हे म्हटलं आहे की मी पॅलेस्टाईनचं समर्थन केल्यानंतरच मला हे माहित होतं की आता माझे बिझनेस डील रद्द होतील. अशा लोकांबरोबर मला डील करायचंच नाही असंही तिने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी हिंसाचाराचं समर्थन करत नाहीच. मी पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी त्या पोस्ट केल्या होत्या असंही तिने आता म्हटलं आहे. मात्र पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्याने आता दुसऱ्याच दिवशी तिचं बिझनेस डील रद्द झालं आहे.
हे पण वाचा- इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात मिया खलिफाची उडी, कायली जेनरवर खास शब्दांत ‘फायरींग’
मिया खलिफाने शापिरोलाही टोले लगावले आहेत. तिने म्हटलं आहे माझं नाव परत घेण्याआधी स्वतःच्या छोट्याश्या कंपनीची चिंता कर. मी आजही आणि यापुढेही लैंगिक छळ होणाऱ्यांच्या बाजूने उभी आहे. स्वतःच्या छोट्या प्रोजेक्टमध्ये मी गुंतवणूक करावी म्हणून भीक मागण्याआधी थोडा अभ्यास कर. माझ्याकडून अपेक्षा करणाऱ्यांना हे माहित नाही का की मी लेबनॉनची आहे. मी इस्रायलचं समर्थन करणं शक्यच नाही असंही मिया खलिफाने म्हटलं आहे.