अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटींची ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या व्यवहारात दलाली देण्यात आल्याच्या प्रकरणी भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी यांची सीबीआयने चौकशी केली. इटलीतील मिलानच्या भारतीय उच्च न्यायालयाशी समकक्ष असलेल्या न्यायालयाने फिनमेकॅनिका व ऑगस्टा वेस्टलँड या कंपन्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मध्यस्थांमार्फत कंत्राट मिळवण्यासाठी दलाली कशा प्रकारे दिली याचे उल्लेख केले आहेत. त्या निकालात त्यागी यांचे नाव वारंवार घेण्यात आले आहे. त्यागी व त्यांचे तेरा नातेवाईक तसेच युरोपातील मध्यस्थाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. माजी हवाई दल प्रमुख त्यागी यांनी  हेलिकॉप्टर्सची विशिष्ट उंचीवरून उडण्याबाबतची अपेक्षा ६००० मीटर ऐवजी ४५०० मीटर केल्याने ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला हे कंत्राट मिळू शकले. पण हा निर्णय विशेष सुरक्षा गट व पंतप्रधान कार्यालय तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायणन यांच्या सल्लामसलतीने झाला होता. सीबीआयने असा आरोप केला आहे, की उंची कमी केल्याने या कंपनीला हेलिकॉप्टर्स पुरवण्याच्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले.

Story img Loader