एपी, सिएटल

माजी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांचे शुक्रवारी वॉशिंग्टनमधील सॅन जुआन बेट येथे विमान अपघातात निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ‘अपोलो-८’चे अंतराळवीर असलेल्या विल्यम यांचे १९६८ मध्ये अंतराळातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे (अवकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीचे काढलेले छायाचित्र) ‘अर्थराईज’ छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते. त्यांचा मुलगा निवृत्त हवाई दल लेफ्टनंट कर्नल ग्रेग अँडर्स यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला.

R R Borade death news in marathi
प्रसिद्ध साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pandharinath Sawant was cremated at Bhoiwada crematorium in Mumbai.
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
Sunita Williams forgets how to walk
सुनीता विल्यम्स अंतराळात बसणं, झोपणं अन् चालणंही विसरल्या? प्रदीर्घ काळ अवकाशात राहिल्याचा काय परिणाम होतो?
Anna Beatriz Pereira Alves dies
ॲडल्ट चित्रपटाचं शूटिंग करताना घडली भयंकर घटना, हॉटेलच्या बाल्कनीतून कोसळून २७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू

सकाळी ११.४० च्या सुमारास एक जुने विमान समुद्रात कोसळले आणि जोन्स आयलंडच्या उत्तर टोकाजवळ ते बुडाले. ‘फेडरल एव्हिएशन असोसिएशन’च्या म्हणण्यानुसार, त्यावेळी ‘बीच ए-४५’ विमानात फक्त पायलटच होते. ‘अपोलो-८’मधील कमांड मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युल काम करत असल्याची खात्री करण्यासोबतच त्याचा पर्यावरणीय प्रभाव लक्षात घेता, अंतराळातून काढलेले उगवणाऱ्या पृथ्वीचे छायाचित्र हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान असल्याचे विल्यम अँडर्स यांनी म्हटले आहे. हे छायाचित्र अंतराळातून पृथ्वीची पहिली रंगीत प्रतिमा असून, आधुनिक इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या छायाचित्रांपैकी एक आहे. अंतराळातून पृथ्वी किती नाजूक आहे हे दाखवण्यासाठी जागतिक पर्यावरण चळवळीला चालना देण्याचे श्रेय या छायाचित्राला दिले जाते.

(२४ डिसेंबर १९६८ मध्ये ‘नासा’ने उपलब्ध केलेले संग्रहित छायाचित्र आहे, जे ‘अपोलो-८’ मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या मागे पृथ्वी दाखवते. विल्यम अँडर्स, अपोलो-८ चे अंतराळवीर ज्यांनी १९६८ मध्ये अवकाशातून ‘अर्थराईज’ छायाचित्र काढले होते.)

Story img Loader