राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री पाटणा येथील त्यांच्या घराच्या पायऱ्या चढत असताना पडले होते. त्यानंतर त्यांना पाटण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने पाटण्याहून दिल्लीला आणण्यात आले आहे.

हेही वाचा- उदयपूर, अमरावतीतील घटनांनंतर विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय; आता गुजरातमध्ये…

समर्थकांचे होम हवन

आज सकाळपर्यंत लालू यादव यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारची हालचाल आढळून आली नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाढत्या समस्यांमुळे दिल्ली एम्समधील डॉक्टरांनी लालू यादव यांची सर्व तपासणी केली. दुसरीकडे लालू यादव यांचे समर्थक त्यांच्या बरे होण्यासाठी पूजापाठ करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पाटण्याच्या अनेक मंदिरांमध्ये होम हवन केले जात आहे. यापूर्वी लालू प्रसाद यादन यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला नेण्यात येणार होते. परंतु फ्रॅक्चरनंतर आता डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुढची पाऊले उचलण्यात येणार आहेत.

हेही वाचा- पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या झाडून हत्या; हत्येनंतर शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

औषधांचा ओव्हरडोजमुळे तब्येत बिघडण्याची शक्यता

एम्सच्या डॉक्टरांना लालू प्रसाद यांच्या आजारांचा इतिहास आधीच माहित आहे. त्यामुळे त्यांना पाटण्याहून दिल्लीत आणण्यात आले आहे. लालू यादव यांच्या शरीरात तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. लालू यादव यांची प्रकृती बिघडण्यामागे औषधांचा ओव्हरडोज असल्याचे सांगितले जात आहे.

Story img Loader