भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी कर्करोगामुळे निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुशील कुमार मोदी यांचे पार्थिव उद्या त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती आहे.

सुशील मोदी यांनी एप्रिल महिन्यात त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली होती. तसेच प्रकृतीच्या कारणामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. सुशील कुमार मोदी हे बिहारमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बरीच वर्ष विद्यार्थी राजकारणात काम केलं होतं. आणीबाणीच्या काळातही त्यांनी मोठा लढा दिला होता.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nitin Gadkari campaign Miraj, Suresh Khade,
काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भाग विकासापासून वंचित, नितीन गडकरी यांचे टीकास्त्र
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Ambernath Vanchit Bahujan Aghadi, Ambernath,
वंचितचा कुणालाही पाठिंबा नाही, उमेदवारासाठी वंचित समर्थपणे रिंगणात, अफवांना पूर्णविराम
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत सुशील कुमार मोदी यांच्या निधनाची माहिती दिली. ते म्हणाले, “बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांचे निधन झालं आहे. बिहार भाजपाचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.”

दरम्यान, त्यांच्या निधानानंतर पंतप्रधान मोदींसह इतर राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, “पक्षातील माझे सहकारी आणि मित्र सुशील मोदी यांच्या आकस्मिक निधनाने दुःख झाले. बिहारमध्ये भाजपाचा उदय आणि यशात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाशी संबंधित विषयांची त्यांची समज खूप खोल होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!”

याशिवाय आरजेडीचे नेते तेज प्रताप यादव यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत दुख: व्यक्त केलं. “सुशील कुमार मोदी आज आपल्यात नाही. या दु:खाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांबरोबर आमच्या संवेदना आहेत.”