राजस्थानमधील भाजपाचे माजी आमदार भंवरलाल राजपुरोहित यांना २० वर्षांपूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणात न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागौर जिल्ह्याच्या एडीजे न्यायालयाने त्यांना आरोपी मानून ही शिक्षा सुनावली. तसेच एक लाखांचा दंड भरण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दंडाची रक्कम बलात्कार पीडितेला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा निर्णय जेव्हा सुनावला तेव्हा ८६ वर्षांचे माजी आमदार राजपुरोहित हे व्हिलचेअरवर बसून न्यायालयात आले होते. न्यायालयाने निकाल सुनावताच त्याच अवस्थेत पोलिसांनी राजपुरोहित यांना अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहेत भंवरलाल राजपुरोहित?

भंवरलाल राजपुरोहित हे नागौर जिल्ह्यातील मकराना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. नागौरच्या एडीजे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर त्यांना आरोपी म्हणून जाहीर केले. हे प्रकरण २००२ मध्ये घडले गेल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या दीड वर्षांनंतर राजपुरोहित भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आमदार होण्याआधी त्यांनी चार वेळा मकराना पंचायत समितीचे अध्यक्षपदही भुषविले होते. आता मात्र या वयात त्यांना शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

हे वाचा >> Mysterious Ball: एलियन्सची तबकडी की बॉम्ब? जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेला तो धातूचा गोळा नेमका आहे तरी काय?

प्रकरण नेमके काय आहे?

मनाना गावात राहणाऱ्या एका २२ वर्षीय महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचारबाबत १ मे २००२ रोजी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार २९ एप्रिल २००२ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ती भंवरलाल राजपुरोहित यांच्या विहिरीवर गेली होती. त्यादिवशी भंवरलाल यांची पत्नी घरी नव्हती. विहीरीवर गेल्यानंतर पीडितेला भंवरलालने स्वतःच्या घरात बोलावलं. पीडितेचा पती मुंबईत राहत होता. तुझ्या पतीशी बोलणं करुन देतो, असे सांगून तिला घरात घेतल्यानंतर तिच्यासोबत अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला होता. त्यानंतर पीडितेने न्यायालयात या प्रकरणाची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

बलात्कारानंतर पीडिता गर्भवती

राजस्थानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार केल्यानंतर सदर पीडिता गर्भवती राहिली होती. ज्यामुळे तिचा गर्भपात करावा लागला. सुरुवातील पोलिसांनी हे प्रकरण हलक्यात घेतले. अत्याचार झाल्यानंतर दीड वर्षातच भंवरलाल आमदार झाले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी थंड पडली होती. कालांतराने पोलिसांनी या प्रकरणाची फाईल देखील बंद केली. मात्र त्यानंतर विरोधकांनी याचं राजकीय भांडवल केल्यानंतर प्रकरण तापले. वीस वर्षांपासून हे प्रकरण मकरनाच्या न्यायालयात सुरु होते. अनेक साक्षीपुरावे, जबाबन नोंदविण्यात आल्यानंतर न्यायालयाने भंवरलाल यांना शिक्षा सुनावली.

बलात्कारानंतर ५०० रुपये देऊन गप्प केलं

भंवरलाल यांनी सदर पीडित महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला ५०० रुपये देऊन गप्प राहण्यास सांगितले होते. पण पीडितेने पैसे तिथेच फेकून दिले. भंवरलाल यांना धडा शिकवणारच असा निश्चय महिलेने केला होता, अशी माहिती राजस्थानमधील वर्तमानपत्रांनी दिली आहे. पोलिसांनी भंवरलाल यांचे राजकीय, सामाजिक वजन पाहून कारवाई करण्यास विलंब केला. मात्र २१ फेब्रुवारी २००६ रोजी न्यायालयानेच या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे पोलिसांना पुढे कारवाई करावी लागली.