अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’चा ताबा घेताच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या पदावर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ‘ट्विटर’चे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी त्यांची नेमणुक केली होती. कंपनी सोडताना अग्रवाल यांना तब्बल ४२ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ३४५ कोटी ७१ लाख ४५ हजार रुपये मिळणार असल्याचा दावा ‘इक्विलर’ या संस्थेनं केला आहे. या सोशल मीडिया कंपनीतून १२ महिन्यांच्या आत हकालपट्टी झाल्याने त्यांना ही रक्कम मिळणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी
अग्रवाल यांचा मूळ पगार आणि त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या समभागांतून ही रक्कम त्यांना मिळणार असल्याचा अंदाज ‘इक्विलर’ या संस्थेनं व्यक्त केला आहे, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. प्रति समभाग ५४.२० डॉलर या मस्क यांच्या ऑफरनुसार ही रक्कम मोजण्यात आल्याचं या संस्थेनं सांगितलं आहे.
Tata Airbus Project: “आता गुजरात एक वेगळा देश होणार आहे का?”
अग्रवाल यांच्यासह ट्विटरच्या कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचीही हकालपट्टी मस्क यांनी केली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरच्या सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांपुढे बेरोजगारीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्लॅटफॉर्मवर विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमं अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल”, असे मस्क यांनी म्हटले आहे.