पीटीआय, नवी दिल्ली
माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला (वय ७९) यांचे शनिवारी निधन झाले. तृतीयपंथीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी त्यांनी महत्त्वाची सुधारणा केली.
चावला हे १९६९च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. २००५ ते २००९ या काळात ते निवडणूक आयुक्त होते. एप्रिल २००९ ते जुलै २०१० या काळात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले. निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही काम केले. २००९ च्या निवडणुका ते आयुक्तपदावर असताना झाल्या. मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी कायदा मंत्रालयाकडे निवडणूक आयुक्तांना हटविण्याची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणेच असावी, अशी घटनात्मक सुधारणेची शिफारस केली होती.
निवडणूक आयोगाने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले, ‘चावला यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. देशाचे १६ वे मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी घटनात्मक सुधारणांसाठी प्रयत्न केले.