भारतीय न्यायव्यस्थेत घराणेशाही, लैंगिक असमानता आणि जातीभेद होत असल्याच्या दावा अनेकांकडून करण्यात येतो. मात्र, हा दावा भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी मोडीत काढला आहे. बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार स्टफीन सॅकूर यांनी घेतलेल्या हार्डटॉक मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर बोलत होते.

भारतीय न्यायव्यवस्थेत घराणेशाहीची समस्या आहे का आणि न्यायालयात हिंदू उच्चवर्णीय पुरुषांचं वर्चस्व आहे का? असा प्रश्न चंद्रचूड यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “जर तुम्ही भारतीय न्यायव्यवस्थेतील जिल्हा न्यायालयाचा विचार केला तर तिथे ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. काही राज्यांमध्ये तर जिल्हा न्यायालयात ६० ते ७० महिला आहेत. आता महिलांपर्यंत कायद्याचं शिक्षण पोहोचलं असल्याने कायदा शाळांमध्ये आढळणारा लिंग समतोल तुम्हाला न्यायव्यवस्थेच्या अगदी खालच्या पातळीवरही (जिल्हा न्यायालय) दिसून येतो. जिल्हा न्यायव्यवस्थेत येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे आणि निश्चितच त्यांची प्रगती होत त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की…

ते पुढे म्हणाले, माझे वडील भारताचे सरन्यायाधीश होते. त्यांनी मला सांगितलं होतं की ते न्यायालयात आहेत तोपर्यंत मी न्यायालयात जाऊ नये. त्यामुळे मी हॉर्वर्ड लॉ स्कूलमध्ये तीन वर्षांचा अभ्यास केला. माझे वडील निवृत्त झाल्यानंतर मी न्यायालयात प्रवेश केला. भारताच्या न्यायव्यवस्थेचा विचार केल्यास बहुतेक वकील आणि न्यायाधीश हे पहिल्यांदाच कायदेशीर व्यवसायात प्रवेश करत आहेत. त्यामुळे तुम्ही जो जातीभेदाचा प्रश्न विचारला त्याहून उलट आमची न्यायव्यवस्था आहे. येथे अनेक उच्च पदांवर महिला आहेत.”

न्यायाधीशांनी नास्तिक असण्याची गरज नाही

राम मंदिराचा निकाल सुनावण्यापूर्वी तुम्ही देवासमोर बसला होतात? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, तुम्ही सोशल मीडिया पाहिलात आणि त्यावर विश्वास ठेवून न्यायाधीशांनी काय म्हटलंय हे शोधलंत तर तुम्हाला कदाचित चुकीचं उत्तर मिळेल. मी नास्तिक आहे असं मी कधीच म्हणणार नाही. न्यायाधीश असण्याकरता तुम्ही नास्तिक असण्याची गरज नाही. मी माझ्या धर्माचा आदर करतो. मला माझा धर्म सर्वधर्म समभावाची शिकवण देतो. त्यामुळे जे माझ्या कोर्टात येतात त्यांना त्यांचा जात धर्म न पाहता मी निर्णय देतो.”

भारतीय न्यायव्यवस्थेत महिलांचा वाढता सहभाग

भारतीय न्यायव्यवस्थेत घराणेशाहीची समस्या आहे का आणि न्यायालयात हिंदू उच्चवर्णीय पुरुषांचं वर्चस्व आहे का? असा प्रश्न चंद्रचूड यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “जर तुम्ही भारतीय न्यायव्यवस्थेतील जिल्हा न्यायालयाचा विचार केला तर तिथे ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. काही राज्यांमध्ये तर जिल्हा न्यायालयात ६० ते ७० महिला आहेत. आता महिलांपर्यंत कायद्याचं शिक्षण पोहोचलं असल्याने कायदा शाळांमध्ये आढळणारा लिंग समतोल तुम्हाला न्यायव्यवस्थेच्या अगदी खालच्या पातळीवरही दिसून येतो. जिल्हा न्यायव्यवस्थेत येणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे आणि निश्चितच त्यांची प्रगती होत त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Story img Loader