देशात सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीवर काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी भाष्य केलं आहे. पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर पहिल्यांदाच आझाद यांनी काँग्रेसच्या ताकदीचं कौतुक केलं आहे. “गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये केवळ काँग्रेसचं भाजपाला आव्हान देऊ शकतं. आम आदमी पक्ष यासाठी सक्षम नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एएनआय’ या वृत्त संस्थेला दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्लेषण: भाजपसमोर आव्हान काँग्रेसऐवजी प्रादेशिक पक्षांचेच? पोटनिवडणुकीतून कशाचे पडसाद?

“मी काँग्रेसपासून विभक्त झालो असलो, तरी या पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाच्या विरोधात मी कधीच नव्हतो. पक्षाची व्यवस्था कमकुवत होत असल्यानेच मी पक्ष सोडला होता. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी करावी, असं मला अजुनही वाटतं. या राज्यांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी आप सक्षम नाही”, असे आझाद यांनी श्रीनगरमध्ये म्हटले आहे. काँग्रेस पक्ष हिंदू, मुस्लीम शेतकऱ्यांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालत आहे, असेही आझाद यावेळी म्हणाले.

८ लाख नोकऱ्या, ३ गॅस सिलिंडर मोफत अन् बरंच काही, भाजपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

“आम आदमी पक्ष हा केवळ दिल्लीचा पक्ष आहे. या पक्षाला पंजाबमध्ये अपयश आले आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिक ‘आप’ला परत मतदान करणार नाहीत. गुजरात, हिमाचल प्रदेशमध्येही हा पक्ष काहीही करू शकणार नाही”, अशी टीका आझाद यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिले होते. असे झाल्यास या निर्णयाचे स्वागत करू, असे आझाद म्हणाले आहेत.

हिमाचल प्रदेशात भाजपचे समान नागरी कायद्याचे आश्वासन; विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध

२६ ऑगस्टला काँग्रेसमधील तब्बल ६२ वर्षांची कारकीर्द संपवून आझाद यांनी ‘डेमोक्रॅटिक आझाद’ पक्षाची घोषणा केली आहे. काँग्रेसमधून राजीनामा देताना आझाद यांनी राहुल गांधींसह पक्षाच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली होती. राहुल गांधी अपरिपक्व असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात आझाद यांनी केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former congress leader gulam nabi azad said congress can only challenge bjp in gujarat and himachal assembly polls aap cant rvs