पीटीआय, नवी दिल्ली

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
Irrfan khan friend NSD batchmates Alok Chatterjee passed away
इरफान खान यांच्या जयंंतीदिनी दुःखद बातमी, त्यांचे बॅचमेट व जवळचे मित्र अभिनेते आलोक चॅटर्जींचे निधन
elderly man died in fire at Sky Pan building in andheri
अंधेरीमधील आगीत वृद्धाचा मृत्यू
Lkoksatta samorchya bakavarun Manmohan Singh career
समोरच्या बाकावरून: ‘अपघाती’ अर्थमंत्र्याची ‘पोलादी’ कारकीर्द
Image Of Rajagopala Chidambaram.
R. Chidambaram : भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे निधन, भारताच्या पहिल्या अणुचाचणीमध्ये बजावली होती महत्त्वाची भूमिका

काँग्रेसचे माजी नेते असलेल्या नटवर सिंह यांनी अनेक दशके परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. त्यांच्या निधनाबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली.

राजनैतिक अधिकारी ते परराष्ट्रमंत्री

नटवर सिंह यांचा जन्म १९३१मध्ये राजस्थानमधील भरतपूरमध्ये झाला. ते १९५३मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाले. ब्रिटनमधे उपउच्चायुक्त, झांबियामध्ये उच्चायुक्त तर पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केले. परराष्ट्र सेवेतील कार्याबाबत त्यांना १९८४ मध्ये पद्माभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

१९८४ मध्ये परराष्ट्र सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली व विजयी झाले. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध खात्यांच्या राज्यमंत्री पदांची जबाबदारी सांभाळली. १९९१मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नटवर सिंह यांनी एन. डी. तिवारी आणि अर्जुन सिंह यांच्या साथीने ‘ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली.

हेही वाचा >>>Yogendra Yadav : “विरोधक मजबूत व्हावेत म्हणून RSS ने…”, योगेंद्र यादवांनी सांगितलं संघाच्या गोटात का

२००४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपावण्यात आली. मात्र ‘अन्नासाठी तेल’ घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी पद व पक्षाचा राजीनामा दिला.

नटवर सिंह यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणाच्या जगात त्यांनी भरीव योगदान दिले. ते आपल्या बुद्धिमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठीही ओळखले जात होते. या दु:खाच्या काळात माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

माजी केंद्रीय मंत्री के. नटवर सिंह यांच्या निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. पद्माभूषणप्राप्त विचारवंत असलेल्या नटवर सिंह यांनी भारताच्या मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र व्यवहारात मोठे योगदान दिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.- मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

Story img Loader