Shaktikanta Das : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्यावर केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. शक्तीकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शक्तीकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) गव्हर्नर पदावरून निवृत्त झाले होते.

शक्तीकांत दास यांच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्तीच्या संदर्भातील आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. शक्तीकांत दास हे पंतप्रधान मोदींचे दुसरे प्रधान सचिव असणार आहेत. २०१९ पासून पी के मिश्रा हे पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहतात. आता शक्तीकांत दास हे देखील प्रधान सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, शक्तीकांत दास हे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शक्तीकांत दास हे तामिळनाडू केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध पदावर काम केलेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी २०१८ ते २०२४ या दरम्यान त्यांनी काम केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर असताना त्यांनी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर होते.

दरम्यान, शक्तीकांत दास हे जवळपास चार दशकांहून अधिक काळ विविध पदांवर काम करत आहेत. महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव पदावरही शक्तीकांत दास यांनी काम केलेलं आहे. तसेच शक्तीकांत दास हे मूळ ओडिशाच्या भुवनेश्वरमधील आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तीकांत दास यांची नियुक्ती आता पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेश येईपर्यंत असणार आहे, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Story img Loader