Former India Cricketer Ambati Rayudu Joins YSR Congress Party : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने गुरुवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत वायएसआर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रायडूच्या स्वागत समारंभात आंध्रचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती तिरुपती रायडू मुख्यमंत्री कॅम्प ऑफिसमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत YSR काँग्रेस पक्षात सामील झाले. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाले होते”, असे YSRCP च्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

रायडूने या वर्षाच्या सुरुवातीला गुंटूरच्या ग्रामीण भागाचा दौरा करत असताना राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. “लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील विविध भागात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचे मी ठरवले आहे. राजकारणात कसे जायचे आणि कोणते व्यासपीठ निवडायचे याबद्दल मी एक ठोस कृती योजना घेऊन येईन”, रायडू जूनमध्ये म्हणाले होते.

रायुडूची कारकीर्द

इंग्लंडमध्ये २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या संघातून वगळल्यानंतर गुंटूरच्या ३८ वर्षीय खेळाडूने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. चार वर्षांनंतर त्याने चेन्नई सुपर किंग्जसह आयपीएल २०२३ चे विजेतेपद पटकावल्यानंतर इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला.

रायुडूने टीम इंडियासाठी २०१३ ते २०१९ पर्यंत ५५ एकदिवसीय सामने आणि ६ टी-२० सामने खेळले. त्याने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये ३ शतके आणि १० अर्धशतकांसह १६९४ धावा केल्या, परंतु मेन इन ब्लूसाठी सर्वात लहान फॉरमॅटमध्ये फक्त ४२धावा केल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former india cricketer ambati rayudu joins ysr congress party welcomed by andhra cm reddy sgk
Show comments