माजी पोलीस अधिकारी तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या किरण बेदी यांची काँग्रेसने सत्ता मिळवलेल्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये आसाम वगळता इतर राज्यांमध्ये भाजपला रोखत प्रादेशिक पक्षांनी सत्ता मिळवली. त्यामध्ये पुदुचेरीमध्ये काँग्रेस-द्रमुक आघाडीने ३० पैकी १७ जागा जिंकून जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचा दारुण पराभव केला. पुदुचेरीमध्ये खातेही खोलता न आलेल्या भाजपने आता किरण बेदी यांना तिथे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी, लेफ्ट. जनरल ए. के. सिंग हे पुदुच्चेरीचे प्रभारी नायब राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत होते. त्यांच्याकडे आता अंदमान आणि निकोबारचा पदभार आहे.
किरण बेदी यांच्या या निवडीवर आप नेता कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून टीका केली की, ”वो जो फिरता था लिए हाथ में सूरज कल तक, आज ख़ैरात में जुगनू बटोर कर ख़ुश है।”. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा